इकरा कोविड केअर सेंटरची महापौर जयश्री महाजन यांनी केली पाहणी; रुग्णांशी केली चर्चा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील इकरा एज्युकेशन सोसायटीच्या कोविड केअर सेंटरची आज बुधवारी  २४ मार्च रोजी महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. महापौरांनी डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा केली. साफसफाई व जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्याने त्या सोडविण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

जळगावात कोविड रुग्ण वाढत असून बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी इकरा कोविड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी डॉ.विजय घोलप आणि इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

इकराच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज दाखल होत असून आणखी बेड वाढविण्यात आले आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मनुष्यबळ कमी पडत असून ते वाढविण्यासाठी मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे महापौर जयश्री सोनवणे यांनी सांगितले. तसेच त्यांनी ऑक्सिजन पुरवठाचा देखील आढावा घेतला.

महापौर जयश्री महाजन यांनी कोविड रुग्णांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली असता साफसफाई आणि जेवणाबाबत रुग्णांनी तक्रार केली. महापौरांनी याबाबत सूचना देत तात्काळ योग्य ती सुधारणा करण्याचे सांगितले.

Protected Content