अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा शेळगाव येथे प्रचार दौरा उत्साहात

Chandrasekhar Attarde 1

जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आज (दि.१०) दुपारी १ वाजता प्रचार दौरा शेळगाव येथे उत्साहात पार पडला.

यावेळी गावातील असंख्य महिलांनी श्री.चंद्रशेखर अत्तरदे व सौ.माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून तसेच फुलहार घालून स्वागत केले. या दौऱ्यावेळी गावकऱ्यांनी ट्रक्टरवर बसवून चंद्रशेखर अत्तरदे यांची मिरवणूक काढली. याप्रसंगी चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासारखा शेतकरी नेता हवा, असा सूर यावेळी गावकऱ्यामधून उमटला. यावेळी संजय भोळे, गणेश पाटील, प्रकाश बारी, सुदाम राजपूत, अरुण सपकाळे, मिलिंद चौधरी, अरुण बर्हा, ईश्वर मराठे, मनोज इंगळे, दीपक ढाके, नकुल चौधरी, दिगंबर खाचणे, सुनिल अत्तरदे तसेच धरणगाव तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच शेळगावचे सरपंच, ग्रा.प.सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) यांच्यासह पदाधिकारी व असंख्य भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content