अशी करा घर बसल्या कोरोनाची ‘सेल्फ टेस्ट’ ! : स्टेप-बाय-स्टेप गाईड

कोरोनामुळे सर्व जण धास्तावले आहेत. अगदी साधा सर्दी-खोकला झाला तरी आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना ? अशी भिती आता सर्वांना वाटू लागली आहे. नागरिकांच्या मनातील ही भिती घालवण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाईन कोव्हीड-१९ अर्थात कोरोना व्हायरस चाचणी सुरू केली आहे. यामुळे आपणही घरबसल्या कोरोनाची चाचणी करू शकतो. ही चाचणी कशी करावी याची अगदी सोप्या स्टेप्समध्ये माहिती दिलीय भुसावळ येथील काउन्सीलर निलेश गोरे यांनी !

कोरोना विषाणूचे थैमान जगभर चालु आहे. त्यातच दररोजच येणार्‍या कोरोनाच्या बातम्या आणि वाढत चाललेली बाधितांची संख्या यामुळे संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. एखाद्याला सर्दी झाली किंवा खोकला आला की मनात शंका यायला लागतात व भीती वाटायला लागते की आपल्याला कोरोना तर झाला नसेल. मी या आधी स्पष्ट केलंय की कोरोना हे जेवढे बायोलॉजिकल चॅलेंज आहे तितकेच सायकॉलॉजील चॅलेंज देखील आहे. तुमच्या-आमच्या मनातील हीच भीती आणि शंका दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खूप सोपी आणि मानसिक आधार देणारे एक ‘सेल्फ टेस्टिंग टूल’ सादर केले आहे. याच्या साहायाने तुम्ही घर बसल्या टेस्ट करू शकता व मनातील शंका दूर करू शकता. ही टेस्ट

https://covid-19.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे.

कशी करायची टेस्ट ?

१. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
२. भाषा निवडून नेक्स्टवर क्लिक करा
३. तुमचे वय आणि लिंग टाईप करा
४. तुम्हाला असलेली लक्षणं निवडा

पर्याय निवडून झाले की लगेचच तुम्हाला रिपोर्ट मिळतो.
यात तीन स्तर आहेत

१. निम्न – कसलीही भीती नाही पण काळजी घायची
२. मध्यम – लक्षण जास्त असल्यास योग्य मार्गदर्शन केले जाते
३. तीव्र – तातडीने तुम्ही काय केले पाहिजे व त्यासाठी मदत दिली जाते.

तुमचे लक्षण मध्यम किंवा तीव्र असल्यास आपला फोन नंबर आणि पिन कोड मागितला जातो.

कोरोना सदृश लक्षणं आल्यास काय करावे ?

या टूलने चाचणी केल्यावर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनासदृश लक्षणे ही मध्यम किंवा उच्च स्वरूपाची असल्यास अशा व्यक्तीचे वैयक्तिक तपशील प्रशासनापर्यंत पोहोचवले जातात. यानंतर पुढील मार्गदर्शन केले जाते.

हे सेल्फ टेस्ट टूल प्रत्येकाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर कोविड १९ रोखण्यासाठी ‘काय करावे’ आणि ‘काय करु नये’ (Do’s & Dont’s) याच्यासह हेल्पलाइन क्रमांक आणि संबंधित माहितीही उपलब्ध आहे. डॉक्टरांकडून दूरध्वनी, व्हिडीओ कॉलद्वारे आरोग्यसेवेचा सल्ला घेण्यासाठीची सुविधाही लवकरच उपलब्ध होणार आहे.

तर मग आता संकोचही नको आणि शंकाही नको टेस्ट करा आणि रिलॅक्स व्हा. टेस्ट पॉझिटीव्ह आली तरी घाबरू नका.

कोरोना विषाणूचा संसर्ग हा आजार पूर्ण बरा होतो. भारतात दि ३ एप्रिल पर्यंत २०० च्या जवळपास पेशंट ठणठणीत बरे झाले आहेत. यामुळे लक्षात ठेवा मन जितके खंबीर असेल तितके लवकर हे युद्ध आपण जिंकणार आहोत. यासाठी आपणास शुभेच्छा. आणि हो; ‘घरी रहा…सुरक्षित रहा’ ! लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करा, वैयक्तीक पातळीवर काळजी घ्या आणि कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करा. धन्यवाद.

nilesh gore

निलेश गोरे,
हिप्नॉथेरपीस्ट आणि सायकॉलॉजीकल काउंसलर,
वेलनेस काऊंसलिंग, नवशक्ति आर्केड,
जामनेर रोड, भुसावळ.
९९२२८५१६७८

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content