शेतकरी मोफत देणार केळी ! : हरीभाऊ जावळेंचा प्रस्ताव

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी मोफत केळी देण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला असून जिल्हा प्रशासनाने याच्या वितरणाची जबाबदारी घ्यावी असा प्रस्ताव माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये अनेक जणांची उपासमार होत आहे. या अनुषंगाने शासनाने जिल्ह्यात निवारागृहे सुरू केली आहेत. येथील गरजूंना केळी मोफत देण्याची तयारी उत्पादकांनी दर्शविली आहे. माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांना शिबिरांमध्ये थांबविले आहे. या सर्वांना मोफत केळी देण्याचा प्रस्ताव केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने देण्यात आला आहे. या शेतातून केळी घेवून जाण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने उचलल्यास आपण मोफत केळी देणार असल्याचे माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासनाने अनुकुलता दाखविल्यास शेतकर्‍यांची बैठक घेवून नियोजन करण्यात येणार आहे. आम्ही केळी उत्पादक शेतकर्‍यांसोबत चर्चा करून आम्ही दररोज आवश्यक तेवढी केळी मोफत उपलब्ध करून देवू. या कठीण प्रसंगात आपल्या परीने योगदान देण्यास शेतकरी तयार आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत माहिती जाणून घेऊन विचारणा केली आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यास प्रशासनाला मोफत केळी देणार असल्याचे माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content