Breaking : पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे लाईट बंद करून दिवे लावा-पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी भारतीयांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत पंतप्रधान मोदी यांनी रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांपर्यंत घरातील सर्व लाईट बंद करून दिवे प्रज्वलीत करण्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला दिलेल्या व्हिडीओ संदेशातून केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करून मध्यरात्रीपासून २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. यानंतर लॉकडाऊनच्या दहाव्या दिवशी अर्थात आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान देशाला व्हिडीओ संदेश देणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली होती. यात पंतप्रधान देशाला नेमका काय संदेश देणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमिवर, पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना महामारीवरूध्दच्या लॉकडाऊनला आज नऊ दिवस झालेले आहेत. या कालावधीत जनतेने शिस्त व सेवाभावाचे दर्शन घडविले आहे. या अभूतपुर्व प्रतिसादाबद्दल ते म्हणाले की, शासन, प्रशासन आणि जनतेने पहिल्यांदा कोरोना विरूध्द लढणार्‍यांच्या विरूध्द व्यक्त केलेली कृतज्ञता सर्वांसाठी पथदर्शी बनले. अनेक देशांनी याच प्रकाराला आपापल्या देशांमध्ये वापरले असल्याची माहिती त्यांनी दिली. देश एकत्रीतपणे कोरोनाच्या विरूध्द लढत आहे. देशाची सामूहिक शक्ती यातून दिसून आलेली आहे. हा लॉकडाऊनचा कालावधी असला तरी आपण एकटे नाहीत. एकशे तीस करोड देशवासियांची सामहिक शक्ती प्रत्येकासोबत असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्याकडे जनता-जनार्दन ईश्‍वराचे रूप असल्याचे मानले जाते. यामुळे कोरानाच्या लढाईत जनतारूपी विराट शक्तीचे दर्शन करायला हवे. यातून आपल्याला नवीन उर्जा मिळणार आहे. या अंधकारातून निरंतर प्रकाशाकडे जायचे आहे. यातून निर्माण झालेल्या अनिश्‍चीततेवर आपल्याला मात करायची आहे. या संकटाला पराजीत करण्यासाठी ५ एप्रिल रोजी आपल्याला कोरोनाला चॅलेंज द्यायचे आहे. या दिवशी आपल्या १३० करोड देशवासियांच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता मला आपले नऊ मिनिट पाहिजे आहेत. या कालावधीत घरातील सर्व लाईट बंद करून. घरात अथवा बाल्कनीबाहेर उभे राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च अथवा मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू करायचे आहे. या माध्यमातून कोरोनाविरूध्द देश एकजुट असल्याचे आपल्याला दाखवून द्यायचे असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, रात्री दीप प्रज्वलन करत असतांना सोशल डिस्टन्सींग पाळण्याचे आवाहन देखील पंतप्रधानांनी याप्रसंगी केले.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content