आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी महसूल मंत्री एकनाथ राव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.  खडसे फार्म येथे दिवसभर एकनाथ खडसे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

 

सकाळी मंदाताई खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे औक्षण केले. त्यानंतर खा. रक्षाताई खडसे, कन्या रोहिणीताई खडसे-खेवलकर, जावई डॉ. प्रांजल खेवलकर व पारिवारातील सदस्यांनी एकनाथ खडसे यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भुसावळचे आमदार संजय सावकारे, मनोज बियाणी, गोलू पाटील, सदानंद उन्हाळे, भालचंद्र पाटील, सुनिल महाजन,  रावेरचे आमदार शिरीष चौधरी आणि सहकारी शेखर पाटील, धनंजय चौधरी, लिलाधर चौधरी यांनी एकनाथ खडसे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

शहादयाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, डॉ. तुषार सनांसे यांच्यातर्फे एकनाथ खडसे यांची लाडू तुला करण्यात आली. पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे गोल्डमन प्रशांत सपकाळ यांनी आणलेला एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेचा ७० किलो वजनाचा केक कापण्यात आला

धुळे येथील सुनिल नेरकर, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष राजेंद्र चीतोडकर, योगेश मुकुंदे व सहकाऱ्यांनी मोठ्या पुष्पहाराने एकनाथ खडसे आणि परिवाराचा सत्कार केला. वाढदिवसाच्या पुर्व संध्येला खामगाव येथील माधव पाटील यांच्या तर्फे भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते.

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीतर्फे एकनाथ खडसे यांच्या स्वागत सोहळ्याचे जी.जी. खडसे महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, संचालक चंद्रशेखर बढे, रामचंद्र चौधरी, रमेश खाचणे, आर. पी. ब-हाटे, मारोती बढे, पुरुषोत्तम महाजन, महेश पाटील यांनी  एकनाथराव खडसे यांचा सत्कार केला.

यावेळी प्रा. एच. ए. महाजन, उप प्राचार्य   ए. पी. पाटील,मुख्याध्यापक मोतीलाल जोगी, आर. पी. पाटील, नितीन भोंबे, विजय लोंढे, प्रा. सुजित पाटील, पंकज घटे आणि कर्मचारी उपस्थित होते.

एकनाथराव खडसे यांच्या हस्ते बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील यांचे पुतणे अभय जगन्नाथ पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ भालेराव, सागर खंडारे, आकाश हिरोळे,  शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते भुषण वानखेडे आणि त्यांचे सहकारी सागर जाधव, आकाश पाटील, संतोष बडगुजर, दिपक तायडे, आश्विन काठोके, कल्पेश बडगुजर, भावेश बावने आणि आमदगाव येथीलसचिन कोळी, अजय कोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

संध्याकाळी कोथळी ग्रामस्थांतर्फे एकनाथराव खडसे यांचा कोथळी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी नारायण चौधरी, उमेश राणे, योगेश पाटील, योगेश चौधरी,  श्रीकृष्ण चौधरी, पवन चौधरी ,जगदीश चौधरी आणि ग्रामस्थांतर्फे एकनाथराव खडसे यांचा सत्कार करण्यात आला.

संजय कपले यांच्यातर्फ़े एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे खेवलकर यांचे फोटो असलेल्या पिशव्यांचे अनावरण करून वाटप करण्यात आले.

खडसे फार्म मुक्ताईनगर येथे दिवसभरात हजारो कार्यकर्त्यांनीएकनाथराव खडसे यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, मुक्ताईनगर नगराध्यक्ष मनिषा पाटील, प्रा. सुनिल नेवे, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, युवक सरचिटणीस संदिप पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांचा समावेश होता.  तसेच किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, जि. प. सदस्य निलेश पाटील, कैलास सरोदे, वैशाली तायडे, वनिता गवळे, रामदास पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, दुध संघाचे संचालक मधुकर राणे, जगदीश बढे यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. यावेळी  हेमराज चौधरी, डॉ. संजीव पाटील, मुक्ताईनगर बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भुसावळ बाजार समिती सभापती सचिन चौधरी, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, म. सा. का. अध्यक्ष शरद महाजन, नरेंद नारखेडे यांनी शुभेच्छा दिल्यात. सोबतच  बुलडाणा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, राष्ट्रवादी मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजु माळी, सावदा शहराध्यक्ष कुशल जावळे, प्रदिप बडगुजर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष बबलु सापधरे, अक्षय चौधरी, तालुका अध्यक्ष विनोद कोळी, शिवसेना युवा सेनेचे पवन सोनवणे,  हे उपस्थित होते. प. स. सभापती किशोर गायकवाड, विकास पाटील, किशोर चौधरी, प्रदिप साळुंखे, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, दिपक पाटील, जीवन राणे, भागवत टिकारे, कैलास चौधरी, अनिल वराडे, अनिल पाटील, वामन ताठे, रामराव पाटील, संदिप देशमुख, रामभाऊ पाटील, पवन राजे पाटील, सुधाकर पाटील, वसंत पाटील,सुधीर तराळ, मुळा पाटील,रणजित गोयनका,नगरसेवक प्रविण पाटील,मस्तान कुरेशी, आसिफ बागवान, बापू ससाणे, भरत पाटील, हकीम बागवान,जाफर शेख, मुजमिल ,सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, पंकज येवले, अजय भारंबे, बाळा भालशंकर, संजय कोळी, संदिप जुमळे, पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content