मारवड येथे लंपी लसीकरण शिबिराचे आयोजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनीधी | तालुक्यातील मारवाड येथे लायन्स क्लब अमळनेर व मारवड विविध कार्यकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने लंपी आजाराचे लसीकरण शिबिराचे शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले.

 

गेल्या काही दिवसांपासून पाळीव तसेच इतर जनावरांमध्ये लंपी या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून येत आहेत.  शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी व जनजागृतीसाठी या शिबिराचा लाभ होणार आहे. जनावरांच्या होणाऱ्या लंपी  त्वचा रोग संबंधी आजारांवर प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. मारवड,गोवर्धन व बोरगाव येथील शेतकऱ्यांना हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन लायन्सचे प्रेसिडेंट योगेश मुंदडे तसेच मारवड वि.का.सो.चे चेअरमन राकेश मुंदडे सोबतच लायन्स व वि.का.सो चे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

 

Protected Content