खडका येथील दोन बंद घर फोडून ६५ हजारांचा मुद्देमाल लांबविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खडका येथे दोन बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत ६४ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दानिगे, रोख रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील खडका येथे आदित्य संतोष चौधरी हा तरूण वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी रमेश मिठाराम सावकारे हे देखील राहतात. ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान दोघांचे घर बंद होते. दोन्ही घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दानिगे, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकुण ६४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्यामकुमार मोरे हे करीत आहे.

Protected Content