Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
107

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एस.के. आईल मिल परिसरातील एका भागातून १७ वर्षीय अल्पवयीन मलीला एकाने काहीतरी आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एस.के.आईल मिल परिसरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २६ डिसेंबर रोजी रात्री १० ते २७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल हे करीत आहे.


Protected Content

Play sound