दुचाकीच्या धडकेत पायी जाणारा तरूण जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पायी जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिल्याने पायाला दुखापत केल्याची घटना सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली. याबाबत दुपारी ४ वाजता अज्ञात दुचाकी धारकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, भाट्या भाज्या बारेला (वय-३०) रा. दिघ्रे ता. भुसावळ हा तरुण परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत असतो. सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भाट्या बारेला हा साकेगाव येथे जाण्यासाठी पायी निघाला होता. त्यावेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीधारकांनी त्याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत भाट्या बारेला याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तसेच अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीधारक हा दुचाकी घेऊन भुसावळकडे पळ काढला. जखमी झालेल्या भाट्या बारेला याला भुसावळ येथील ट्रामा सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे

Protected Content