इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । केंद्राने केलेल्या पेट्रोल, डीझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने  आकाशवाणी चौकात  आंदोलन करण्यात आले.  

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयातून आकाशवाणी चौकापर्यत मोर्चा काढून केंद्र सरकारच्या  निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घेतली नाही, तर जन आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात  आला. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर वाढत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच पेट्रोल ,डिझेल आणि गॅस दरात आणखी वाढ करण्यात आली. या दरवाढीच्या निषेधार्थ  आज जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्राच्या दरवाढीचा विरोध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोखा आंदोलन करण्यात आले.  यावेळी  गॅस सिलेंडरला हार घालून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी चव्हाण, डॉ. सुषमा चौधरी, मंगला पाटील, शकीला तडवी उपस्थित होते.

याप्रसंगी वंदना  चौधरी  म्हणाल्या की,कोरोनाच्या संकटातून कसे सावरायचे याचे उत्तर लोकांना सापडत नसतांना केंद्र सरकारतर्फे पेट्रोल, डीझेल व गॅसची  दरवाढ केली जात असल्याने सर्वसामान्यांनी जगावे कसे असा प्रश्न पडला आहे.  यातच आत्ता प्रत्येक दिवशी पेट्रोल व डीझेलची दरवाढ केली जात आहे. भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यात सुख वाटत आहे. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात आहे. मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले असून इंधन दरवाढीने दुहेरी संकटाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. मोदी सरकारने दाखविलेल्या अच्छे दिन चे स्वप्न भंग पावले आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.  कोरोना काळात जनतेला दिलासा  देण्याएवजी दरवाढ केली जात असल्याने सर्वसामन्यांनी जगावे कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी  केंद्रावर आरोप करतांना सांगितले की, कोरोनाच्या महासंकटात केंद्राने नागरिकांना मदत करायला पाहिजे. मात्र, या एवजी केंद्राने पेट्रोल , डीझेल, गसची दरवाढ करून सर्वसामान्यांची निराशा केली आहे. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/132575362159982

 

Protected Content