नांदूर पिंप्री येथून अल्पवयीन मुलीला पळविले; मुक्ताईनगर पोलीसात एकावर गुन्हा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील नांदूर पिंप्री येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली असून याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

सविस्तर असे की, मध्यप्रदेशातील नेपानगर येथील कुटुंबिय कामाच्या निमित्ताने तालुक्यातील नांदूर पिंप्री येथे स्थायिक झाले आहे. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबिय जेवण करून झोपलेले असतांना रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सुनिल रामसिंग बिलाला (वय-२५) रा. नेपानगर, जि. बऱ्हाणपूर (म.प्र.) याने फूस लावून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले. नातेवाईका आणि ओळखीच्या लोकांकडे तपास करून मुलगी मिळून आली नाही. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि निलेश सोळंखे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.