महापालिकेची प्लास्टीक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील बेंडाळे चौकातील कोंबडी बाजार येथील प्लास्टी‍क विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकून प्लास्टीक पिशव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. दुकाराकडून दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्लास्टीक पिशव्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील बेंडाळे चौकाजवळील कोंबडी बाजार येथील लोकेश ट्रेडर्स दुकाना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा साठा असल्याची गोपनिय माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत लोकेश ट्रेडर्स दुकानातून १८० किलो प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आला आहे. दुकान मालाक कैलास कोळी यांच्या दंडात्मक कारवाई करत १० हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.

तर १८० किलो वजनाच्या प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे, संजय बागुल यांनी कारवाई केली आहे.

Protected Content