गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर जप्त

रावेर प्रतिनिधी । गोवंशाच्या गुरांची अवैध वाहतूक करणार्‍या कंटेनरला पोलीसांनी कारवाई करून जप्त केले असून कंटेनरचा चालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चोरवड नाक्याजवळून जाणार्‍या कंटेनर क्रमांक एचआर ६८ बी ०५२० यात आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास गोवंशाची गुरे वाहून नेतांना आढळून आले. यामुळे पोलिसांनी या कंटेनाला थांबवरून यातील ०७ गायी; २५ बैले व कंटेनर असा एकूण २९,०००००/-रु
रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. मजकुर यांनी त्याच्या ताब्यातील वरील क्रमकाच्या कंटेनर मधून गोवंश जातीचे ०७ गायी व २५ बैल असे अवैध रित्या बेकायदेशीर पणे गोवंश जातीचे गुरे कोंबून त्यांची कोणतीही काळजी न घेता अत्यंत क्रूरतेने त्यांचे पाय मान तोंड दोरीच्या साहाय्याने सक्षम वैद्यकीय अधिकार्‍याचे प्रमाणपत्र शिवाय कत्तली करीता बाळगून वाहतूक करतांना मिळून आला. तर कंटेनर चालक मात्र कंटेनर सोडून पळून गेला. दरम्यान, या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशन भाग ०५ गु. र. नं.- ११५/२०२० भादंवि कलम- ४२९ महा. पशु संवर्धन अधि-५अ, ब,९ महा.पशु क्रूरता अधि.११ चे (१)(-)(ऋ)(क)(घ)(ख)९ महा पोलीस अधि.१९५१ चे क१९९ महा पशु वाहतूक अधि-४७,४८,४९(अ) मोटार वाहन कायदा क ८३/१८७
अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content