गिरणा पंपिंग जवळील शेतीचा बंधारा कोरून केला जातोय वाळू उपसा; शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरात वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे, यातच आता गिरणापंपिंग जवळील गिरणा नदीपत्रा शेजारील शेतीच्या बाजूला मोठे खड्डे करून वाळू काढली जात आहे. प्रशासनाला तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. खड्ड्यामुळे शेतीची जमीन खसून नुकसान होणार असून तातडीने वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

गिरणा पंपिंग जवळील आर्यन पार्कच्या पाठीमागे आणि गिरणा नदीच्या काठावर शेत गट क्रमांक 304/अ/1 आणि 3 मध्ये शेतकरी ओंकार सोनू कोळी आणि हेमंत रघुनाथ कोळी यांच्या मालकीचे शेत आहे. या शेताच्या बाजूला गिरणा नदी असल्याने दिवसा आणि रात्री अवैधरित्या वाळूची मोठ्याप्रमाणावर वाहूतुक होत आहे. जिल्हा प्रशासनाने अनेकवेळा कारवाई करून देखील वाळू वाहतूक करणारे मोठ्या प्रमाणावर वाहतूक करत आहे. आता एवढेच नाही तर शेतकऱ्यांचे शेताच्या बाजूला असलेले बांध देखील कोरून वाळू काढली जात आहे. त्या भविष्यात शेतकऱ्यांची जमिनीला देखील धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात शेतकरी हेमंत कोळी आणि ओंकार कोळी यांनी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महसूल प्रशासनाला या संदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या तक्रारीबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

गिरणा नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा करून गिरणाकाठच्या शेतातून वाहतूक करत आहार. शिवाय आता गिरणा नदीपात्रात वाळू साठा कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधाच्या बाजूला मोठमोठे खड्डे करून वाळू काढली जात आहे. त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडले आहे. भविष्यात होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Protected Content