अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातून बेकायदेशीरपणे अंधाराचा फायदा घेत गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करत वाहन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील उटखेडा-भातखेडा रस्त्याने असलेल्या खदानीतुन सायंकाळी अवैध गौण खनिजची वाहतुक होत असल्याची माहीती महसूल पथकाला समजली. महसूल पथकाने कारवाई करत (एमएच १९ डीव्ही ५७८६) नंबरच्या ट्रॅक्टरमधून विना परवाना गौण खनिजाची वाहतूक करत असतांना उटखेडा रोडवर पकडले. वाहतूकीचा परवाना चालकाला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केले आहे. ही कारवाई मंडळाधिकारी मंडळ अधिकारी मीना तडवी, मंडळाधिकारी विठोबा पाटील, तलाठी गुणवंत बारेला रावेर, तलाठी स्वप्निल परदेशी सहस्त्रलिंग, तलाठी अंजुम तडवी सावखेडा, तलाठी निलेश चौधरी यांच्या पथकाने केली.

Protected Content