Home Cities रावेर जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलचा एसएससी निकाल ९८.५९ टक्के

जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलचा एसएससी निकाल ९८.५९ टक्के


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना मूल्याधारित आणि कृतीयुक्त शिक्षण देत सुजाण नागरिक घडविण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलने यंदाच्या एसएससी परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल यश संपादन केले आहे. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल तब्बल ९८.५९ टक्के लागला असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या निकालामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालक, शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयातील शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्तबद्ध अभ्यास पद्धती यामुळे यंदाही शाळेने यशाची परंपरा कायम राखली. यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनी कृतिका अजय फेगडे हिने ९६.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. सृष्टी नितीन धानोरे हिने ९४.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर अमेय पंकज तळेले याने ९२.०० टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांकावर स्थान मिळविले.

यंदाच्या एसएससी परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण ७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. तसेच १९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. २१ विद्यार्थी ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवत उत्तीर्ण झाले, तर २४ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांखाली गुण मिळवत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  शरददादा जिवराम महाजन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष  उल्हास निंबा चौधरी, सेक्रेटरी विजय रघुनाथ झोपे, जॉईंट सेक्रेटरी शशिकांत रामचंद्र चौधरी, सर्व संचालक प्रतिनिधी, सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य  मोझेस जाधव, पर्यवेक्षिका सौ. पुनम नेहेते, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलने सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, यंदाचा एसएससी निकाल हा त्या यशस्वी परंपरेचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.


Protected Content

Play sound