आज देखील कोरोनातून बरे होणार्‍यांची संख्या बाधीतांपेक्षा जास्त !

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात ४४६ रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले असले तरी आजच ८०३ रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. यामुळे कोरोना विरूध्दच्या लढाईला बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संसर्गातून बरे होणार्‍यांची संख्या आता लक्षणीयरित्या वाढीस लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन बाधितांची संख्या कमी होत असून बरे होणार्‍यांची संख्या त्यापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. हाच ट्रेंड आज देखील कायम राहिल्याचे दिसून आले आहे. आज जिल्ह्यात नवीन ४४६ कोरोना बाधीत आढळून आले आहे. मात्र, यासोबत आज जिल्ह्यातील ८०३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये जळगाव शहरात १४० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. जळगाव ग्रामीण मध्ये २६ पॉझिटीव्ह आहेत. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचा विचार केला असता, भुसावळ-५५; अमळनेर-११; चोपडा-५३; पाचोरा-७; भडगाव-१४; धरणगाव-२३; यावल-५; एरंडोल-५; जामनेर-२२; रावेर-११; पारोळा-१०; चाळीसगाव-२८; मुक्ताईनगर-१९; बोदवड-७ आणि इतर जिल्ह्यांमधील ९ असे रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आज ८०३ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ३५,१७८ इतकी झाली आहे. तर आज ४ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११२९ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ९,१२२ इतके आहेत.

Protected Content