गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात सातव्या दिवशी गणरायाचे उत्साहात विसर्जन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील गोदावरी नर्सींग महाविद्यालयात गणरायाला सातव्या दिवशी आज मंगळवार, दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता ढोल ताश्याच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप करण्यात आला.

कोरोनाच्या काळानंतर यंदा गणेशोत्सव आंनदात स्थापनात करण्यात आले. चैतन्याच्या वातावरणात गणरायाची स्थापन करण्यात आल्यानंतर बहुतेक ठिकाणी पाचव्या आणि सातव्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. जळगाव शहरातील गोदावरी नर्सींग महाविद्यालयात मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक यांनी विसर्जन मिरवणूकीत सहभाग नोंदविला होता.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, प्राचार्य प्रविण कोल्हे, पियुष वाघ, शिवा बिरादर, महाविद्यालयाचे डीन डॉ. एन.एस.आर्वीकर, माया आर्वीकर यांनी ढोल ताश्याच्या तालावर एकच ठेका घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विसर्जन मिरवणूकीत लावलेल्या डीजेच्या तालावर नृत्य सादरीकरण केले.

Protected Content