स्वच्छ भारत योजनेत घोटाळा; आ. चंद्रकांत पाटलांची तक्रार

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीतील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या योजनेत आर्थिक घोळ झाला असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अश्या मागणीचे पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांना दिले आहे.

रावेर तालुक्यात गरीब कुटुंबाना शौचालय बांधकाम करण्यासाठी शासन अनुदान म्हणून बारा हजार रुपये देते. परंतु या गरीबांच्या अनुदानात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रावेर तालुक्यातील स्वछ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाचे प्रकरण गाजते आहे.प्रकरण दडपण्यासाठी स्वछ भारत मिशन कक्षातील कंत्राटी कर्मचारी यांचा बळी देऊन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याच्या वेगवान हालचाली सुरु असल्याची चर्चा पं.स. रावेर कार्यालयात सुरू आहे. मात्र आता या प्रकरणी आ. चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घातल्याने निःपक्षपाती पणे चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल अश्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान रावेर पंचायत समितीतील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देण्यात येणारे वैयक्तिक शौचालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड आहे.या प्रकरणी बीडीओ यांनी त्रीसदस्यीय चौकशी समिती देखिल नेमली होती. समितीला सात दिवसाचे अल्टीमेटम होते. परंतु एक महीन्याच्या वर कालावधी उलटून सुध्दा अद्याप अहवाल येत नसल्याचे संशयव्यक्त केला जात आहे.तालुक्यात मागील चार वर्षात सुमारे १८ कोटीच्या वर रक्कम खर्ची पडली आहे. या वैयक्तिक शौचालयाच्या आर्थिक गैरव्यवहाराकडे शेजारील आमदार चंद्रकांत पाटील या लक्ष देऊन चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करतात.परंतु रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने; जनतेत नाराजीचा सुर आहे. वैयक्तिक शौचालयाच्या माध्यमातुन गरीब कुटुंबाना बारा हजार रुपये अनुदान दिले जाते.याच अनुदानात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

 

Protected Content