नाईक यांच्या अडचणी वाढणार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – नवी मुंबई ऐरोली विधानसभेचे आ. गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीवरून नेरूळ आणि सीबीडी बेलापूर अशा दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून आ. नाईक यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे.

ऐरोली विधानसभा मतदार संघातील भाजपचे आ. गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेच्या तक्रारीवरून महिलेला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात शनिवारी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांना राज्य महिला आयोगाने निर्देश दिल्यानंतर आ. नाईक यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमातून व्हिडीओमध्ये गणेश नाईक यांच्या अटकेसंदर्भात म्हटले आहे.

ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाला ईमेलद्वारे तसेच प्रत्यक्षात भेट घेत सविस्तर वृत्तांत आणि तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन. राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबई सीबीडी बेलापूर आणि नेरूळ पोलीस स्थानकामध्ये गणेश नाईक यांच्याविरोधात दाखल झालेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे असून गणेश नाईक यांना अटक करुन पुढील चौकशी व कारवाई केली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

Protected Content