धाबे येथे सरदार पटेल जयंतीनिमित्त ६० बालकांना बूट-मोजे देणार

dhabe program

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील धाबे येथे आज (दि.३१) हिवाळी सुटी सुरू असतांनाही काही विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची १४४ वी जयंती शाळेचे मुख्याध्यापक व राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रीय एकता दिवस म्हणुन साजरी केली.

 

सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंघ करण्यासाठी जशी संपुर्ण देशभरात एक दीर्घ यात्रा काढली होती, त्याचप्रकारे गावात ‘एकता दौड’ काढण्यात आली. विद्यार्थी व गावकऱ्यांनी त्यात उत्साहाने सहभाग घेतला. त्या अगोदर भारतरत्न सरदार पटेल यांच्या तैलचित्राला अभिवादन करून सर्वांनी आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाचा फोटो व्हॉटसअप ग्रुपवर शेअर केल्यावर शाळेतील विदयार्थ्यांच्या पायात बुट नाही, हे बघुन एका दात्याने त्यांना बुट व मोजे देण्याचे कबूल केले आहे. हिवाळी सुटी संपल्यावर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना त्याचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल व गणेश क्षत्रिय यांनी सहकार्य केले.

Protected Content