गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष अतिथी म्हणून किरण सोहळे यांची निवड

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  |  ५३ व्या IFFI आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विवेकानंद प्रतिष्ठानच्या संगीत विभागाचे प्रमुख किरण सोहळे यांची विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली  असून  त्यांना भारत सरकारचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांचे विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

 

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NFDC)माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने आयोजित  भारत सरकारचा एकमेव अधिकृत चित्रपट महोत्सव दिनांक २० ते २८ नोव्हेंबर २०२२ रोजी गोव्यात संपन्न होत आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा प्रथमच खान्देशाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून विवेकानंद प्रतिष्ठानच्या संगीत विभागाचे प्रमुख किरण सोहळे ह्यांची महोत्सवात विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे. दि.२६ ते २९ नोव्हेंबर ह्या कालावधीत किरण सोहळे यांना महोत्सवात सहभागी होण्याचे भारत सरकारचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. संपूर्ण भारतातुन मोजक्या ३ – ४ व्यक्तींना हि संधी मिळत असते. हा बहुमान यंदा विवेकानंद प्रतिष्ठानला मिळाला आहे. या निवडीबद्दल प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे ,व्यवस्थापन मंडळ सदस्य हेमाताई अमळकर, विनोद पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

 

Protected Content