मजूराची मोटारसायकल चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोरून एका मजुराची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अर्जुन हरचंद जाधव (वय-१९) रा. हरिनगर तांडा ता. जामनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अर्जुन जाधव हा त्याची मोटारसायकल क्रमांक ( एमएच १९ बीके ४२१९) ने जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ कामानिमित्त आलेल्या होता. कॉलेजच्या बाहेर त्यांनी मोटारसायकल पार्क करून लावली होती. दरम्यान आज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली मोटारसायकल चोरून नेली. हा प्रकार दुपारी १ वाजता लक्षात आले. तरूणाचे त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु मोटारसायकल कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.

Protected Content