यावल कृउबा निवडणूक तीन केंद्रात होणार मतदान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ एप्रिल रोजी होत असलेल्या पंचवार्षीक निवडणुकीच्या मतदानासाठी यावलसह साखळी व फैजपूर येथे मतदान केंद्र राहणार असून झालेल्या मतदानाची मतमोजणी ३० एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १९ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखा परीक्षक पी.एफ.चव्हाण यांनी दिली आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीच्या एक १८ संचालक निवडीसाठी मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत राहणार असून यावल शहरात शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय, तर तालुक्यातील साकळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा व फैजपूर येथे म्युनिसिपल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे मतदान केंद्र राहणार आहे.

यावलसह साकळी व फैजपूर येथे सहकारी संस्था मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार मतदान करतील तर व्यापारी व हमाल तोलारी मतदारसंघाचे मतदारांसाठी यावल येथेच मतदान करता येणार आहे. यावल तालुक्यातील ४९ सेवा सहकारी संस्था व ६७ ग्रामपंचायतचे मतदार संख्या मतदार संघ निहाय पुढील प्रमाणे विभागलेले आहेत.

यावल-येथे सेवा सहकारी संस्था २१तर ३० (ग्रा.पं, ),फैजपूर-येथे १३ सेवा सह.संस्था तर २० ग्रा. पं. साकळी-येथे १५सेवा सहकारी संस्था तर १७ग्रा.पं.अशा ४९ सेवा संस्था व ६७ ग्रामपंचायतीचे मतदार या मतदान, केंद्रावर मतदान करतील.

मतदार संघ निहाय असलेले मतदार पुढील प्रमाणे- सेवा सहकारी संस्था ६०४,ग्रामपंचायत मतदार संघ ६६७ , व्यापारी मतदार संघ ३३३ ,हमाल तोलारी मतदार संघासाठी१००८,असे मतदार आहेत ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ. चव्हाण यांनी दिली आहे. यावल तालुक्यात महाविकास आघाडी व भाजप-सेने साठी अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठीचे प्रचार शेतकरी विकास पँनल आणी सहकार पॅनलच्या वतीने वेगाने सुरूअसुन , आमच्याच पक्षाला बहुमत मिळेल असा दावा आघाडी व युतीच्या पदाधिकारी यांच्याकड्डन व्यक्त करण्यात येत आहे .

Protected Content