भाजपा अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्षापदी सना जहांगीर खान

जळगाव, प्रतिनिधी | सना जहांगीर खान यांची अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी नियुक्ती केली आहे. त्यांना नुकतेच आमदार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे आणि जळगाव जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

सना जहांगीर खान ह्या मुक्ताईनगर तालुक्यापासून ते जळगाव जिल्ह्यापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. त्या १९९३ पासून भारतीय जनता पार्टीच्या सदस्या आहेत. २०१२ ते २०१४ पर्यंत जिल्हा चिटणीस, २०१४ ते २०२० जिल्हा उपाध्यक्षा, अल्पसंख्यांक सेवा संघ जिल्हा अध्यक्ष, मायनोरीटी एजुकेशन वेल्फेअर सोसायटी अध्यक्षा, महिला विकास फौंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांना देण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल माजी मंत्री आ.गिरीश महाजन, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, आ.राजुमामा भोळे, जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, मा.खा.रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील, आ. चंदूभाई पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, रेखा पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शहबाज शेख, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष आरिफ शेख, साबीर(गुड्डू)पठाण, उपाध्यक्ष मोहमद शेख, अल्पसंख्यांक युवा मोर्चा अशफाक शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content