एरंडोल येथे स्मशानभूमी व आठवडे बाजाराचे लोकार्पण

एरंडोल, प्रतिनिधी | येथील नगरपालिका मार्फत गट नंबर १५८८ येथील स्मशानभूमी व आठवडे बाजाराचे लोकार्पण सोहळा भारतीय जनता पक्षाचे जनजाति क्षेत्रे प्रमुख किशोर काळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

 

स्मशानभूमी व आठवडे बाजार लोकार्पण सोहळा लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी मुख्याधिकारी विकास नवाळे, नगरसेवक योगेश देवरे, मनोज पाटील, नितीन महाजन, अभिजीत पाटील, सुरेश पाटील, जहिरोद्दीन शेख कासम, अब्दुल शकूर अ. गनी, असलम पिंजारी, डॉ. नरेंद्र ठाकूर. नगरसेविका सरला पाटील, छाया दाभाडे, जयश्री पाटील, आरती महाजन, वैशाली महाजन, कल्पना महाजन, नरेंद्र पाटील, अतुल महाजन, कार्यालय अधीक्षक हितेश जोगी, बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

किशोर काळकर यांनी यावेळी सांगितले की, एरंडोल शहरात विविध प्रकारची विकास कामे झालेली आहे. तसेच आताच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांनी एरंडोल शहरात नागरिकांना दिलेला शब्द पाळत भरतोस विकास कामे केलेली आहेत. नगराध्यक्ष रमेश सिंग परदेशी यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरातील गरीब व जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
दरम्यान यानंतर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती रमेश सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली रंगारी खडक खिडकी ते नागफणी यामधील पुलाचे बांधकाम करण्याची निविदा मंजूर करण्यात आली त्याच सूचक नगरसेविका जयश्री पाटील यांनी केले त्याला अनुमोदन नगरसेवक योगेश दिले त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली विशेष सभेमध्ये विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली

Protected Content