‘या’ मतदारसंघातील वंचित बहूजन आघाडीचा उमेदवारी अर्ज बाद

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात दोन आघाडया तयार झाल्या आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायूती आहे, तर काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. या दोन आघाडयाविरोधात वंचित बहूजन आघाडी पक्षाने एकला चलोचा नारा देत कोणासोबत ही आघाडी न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित ने राज्यातील अनेक ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठिंबाही दिला आहे. परंतू विदर्भातील एका मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे यवतमाळ-वाशिमचे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. अर्जात काही त्रुटी असल्यामुळे हा अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे येथे वंचित बहूजन आघाडीने आपली एक जागा गमावली आहे.

Protected Content