अमरावतीतून वंचितची माघार; आनंदराज आंबेडकरांना दिला पाठिंबा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचिम बहूजन आघाडीने माघार घेतली आहे. वंचितने या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीने आठवड्याभरापूर्वी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याचा विरोध केला होता. आनंदराज आंबेडकरांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील असे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या आहेत.

रेखा ठाकूर यांनी पत्र लिहून आनंदराज आंबेडकरांनी आपला उमेदवार मागे न घेण्याचा सल्ला दिला आहे व त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे. वंचित अमरावती मतदारसंघात उमेदवार देणार नाही आहे. असा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक बहूरंगी झाली आहे. येथे काँग्रेस, भाजप, प्रहार पक्ष आणि वंचित असा सामना होणार आहे. पण आता वंचिततर्फे आनंदराज आंबेडकर अपक्ष म्हणून पुढे आले आहे.

Protected Content