नशिराबाद येथे पोलीसांची छापेमारी; 35 लाखांचा गुटखा जप्त

jalgaon nashirabad yethe karwai

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळच असलेल्या नशिराबाद येथील गोडावून येथे आज दुपारी पोलीसांनी छापा टाकून कारवाई करत तब्बल 35 लाख 50 हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे ढाबे दणाणले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अचानक गोडावूनवर टाकला छापा
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धिरज मिश्रा (पुर्ण नाव माहिती नाही) यांनी नशिराबाद हद्दीतील तरसोद फाट्याजवळ मकरा गोडावूनमधील B सेक्टरमधील गोडावून क्रमांक 21 विकत घेतले होते. त्या गोडावून मध्‍ये धिरज मिश्रा यांनी 35 लाख 50 हजार रूपयांचा गुटखा भरलेला होता. पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहम यांनी अन्न प्रशासन विभाग आणि नशिराबाद पोलीस, एक टीआरपी आणि आरटीपीसी पथकाच्या हजेरीत आज दुपारी 1 वाजता अचानकरित्या छापा टाकला.

कटरने कापले गोडावूनचे कुलूप
त्यावेळी गोडावूला दोन मोठे कुलूप लावले होते. कुलूप कापण्यासाठी पोलीसांनी कटरच्या सहाय्याने कुलूप तोडले. आप जवळपास गोवा 1000 नावाच्या गुटखाने भरलेले एकुण 60 मोठे बॅग्ज मिळून आले. एका बॅग मध्ये सहा बॉक्स पॅक करून ठेवण्यात आले होते. तर एका बॉक्समध्ये सहा पाकिटे आढळून आली.

नाशिराबाद पोलीसांनी एकाला घेतले ताब्यात
पोलीसांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आल्यानंतर संशयित म्हणून दुकान मालक आणि गुटख विक्रेता धिरज मिश्रा याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

Protected Content