पंकजा मुंडे व रोहिणी खडसेंना पाडणार्‍यांवर कारवाई व्हावी-नाथाभाऊ

khadse e1550572684596

मुंबई प्रतिनिधी । पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातीलच काही जणांनी पाडल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार करून संबंधीतांवर प्रदेशाध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे. त्यांनी थेट आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गत विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा अतिशय धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या पराभवात भाजपमधीलच एका गटाचा हातभार असल्याचे दिसून आले. पहिल्यांदा याची दबक्या आवाजात चर्चा झाली. तर एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच हा जाहीर आरोप केला. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या १२ डिसेंबर रोजी भगवान गडावरील कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झालेली असतांना आज एकनाथराव खडसे यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी यानंतर एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला. यात ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांच्या पराभवासाठी पक्षातील काही मंडळी जबाबदार असून त्यांची नावे आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कळविली आहेत. आता त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी आपली अपेक्षा असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. पक्ष नेतृत्वावरच आपला रोष असल्याचे ते म्हणाले. भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला डावलले जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

Protected Content