पीएनबीला ५.४२ कोटींचा चुना लावणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । पंजाब नॅशनल बँकेला बनावट कोटेशनच्या माध्यमातून तब्बल ५.४२ कोटी रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील गुरूकुल कॉलनी येथील कमल खेमचंद चौधरी, लीना जयेश नेहते, शैला उमाकांत नेहते, सोहन उमाकांत नेहते, जयेश उमाकांत नेहते आणि उत्तम तुळशीराम चौधरी यांनी पंजाब नॅशनल बँकेतून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. त्यांनी हे कर्ज प्रत्यक्ष व्यवसायासाठी न वापरता बनावट नावाने कोटेशन तयार करून बँकेची सुमारे ५.४२ कोटी रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी त्यांना पंजाब नॅशनल बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अरूण आर्य आणि संजय सिताराम लोणारे यांनी मदत केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार २५/०३/२०१७ ते ५/१/२०१९ च्या कालखंडात घडला. हे प्रकरण निदर्शनास आल्याने बँकेचे अधिकारी उत्तमकुमार मधुमंगल गरतिया यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या रकमेचा घोट उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Add Comment

Protected Content