डीएचएफएलने केला ३१ हजार कोटींचा घोटाळा- कोब्रापोस्टचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली वृत्तसंस्था । डीएचएफएलने कर्ज वाटपामध्ये तब्बल ३१ हजार कोटी रूपयांचा घोटाळा केल्या असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आज कोब्रापोस्टने केला आहे.

जबरदस्त गौप्यस्फोटांसाठी ख्यात असणार्‍या कोब्रोपोस्टने काही दिवसांपूर्वीच आपण २९ जानेवारी रोजी खूप मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमिवर आज या संकेतस्थळाने डीएचएफएलच्या घोटाळ्याची माहिती जाहीर केली आहे. डीएचएफएलने अनेक बनावट कंपन्यांना बेकायदेशीर कर्ज केले. नंतर हीच रक्कम डीएचएफएलच्या प्रमोटर्सच्या कंपन्यांकडे वळविण्यात आल्याचा दावा कोब्रापोस्टने आपल्या स्टींग ऑपरेशनमध्ये केला आहे. या माध्यमातून हजारो कोटी रूपयांचा घोळ करण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, डीएचएफएलमध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत असणार्‍या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी २०१४-१५ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये भाजपला एकूण सुमारे १९.५ कोटी रूपयांचे डोनेशन दिल्याची माहितीदेखील कोब्रोपोस्टने दिली आहे.

Add Comment

Protected Content