रावेर पोलीस ठाण्यात डॉ. संदीप पाटील यांचा सन्मान

रावेर प्रतिनिधी । रावेर माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील यांनी डॉक्टरची पदवी असतांना नुकतीच एल.एल.बी.चे शिक्षण पुर्ण केले आहे. रावेर पोलीस ठाण्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.

माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील हे स्रीरोग तज्ञ असून शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी मध्य प्रदेशच्या देवी अहिल्याबाई विश्वविद्यालयच्या बुरऱ्‍हानपुर येथून आपले (बॅचरल ऑफ लॉ )एल एल बी चे शिक्षण पूर्ण केले आहे. डॉक्टर असून कायद्याची पदवी घेणारे डॉक्टर संदीप पाटील रावेरात पहिलेच व्यक्ती असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच कोरोना काळात शासना मदत करत कोरोना व्हायरस साठी समाजात जन-जागृती केल्या बद्दल आज डॉक्टर संदीप पाटील यांचे रावेर पोलिस स्टेशन मध्ये सन्मानपत्र देऊन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी गौरवले आहे.

Protected Content