भाव नसल्याने लिंबू शेतातच पडून : बागायतदार हवालदिल (व्हिडिओ)

चाळीसगाव, प्रतिनिधी । सध्या कोरोनामुळे शेतकऱ्याच्या सर्वच मालाला भाव नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. यातच होत असलेल्या पावसामुळे मागणी नसल्यामुळे लिंबू या फळाला देखील भाव नसल्याने अनेक बागांमध्ये लिंबू झाडा खाली पडून सडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सध्या चाळीसगावच्या मार्केटमध्ये लिंबूला ३ ते ५ रुपये किलो इतका नगण्य भाव मिळत आहे. मात्र हाच लिंबू बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्याला २ रुपये किलो तोडणीची मजुरी, गाडी भाडे आणि स्वतःचा वेळ हा सगळा हिशोब पाहता लिंबू विकून स्वतःवर कर्ज करून घेण्याची पाळी येत आहे. यामुळे शेतकरी आता हा लिंबू तोडण्याच्या नादात पडत नसून लिंबू शेतातच पडून सडत आहे. प्रचंड खर्च फवारण्या करून हातातोंडाशी आलेले हे फळ आज कवडीमोल झाल्याने लिंबू उत्पादक बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. सर्वत्र असलेल्या मंदीमध्ये ही अडचण त्यांना परवडण्यासारखी नसल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. निसर्ग चक्रीवादळामध्ये कोकणातील नारळ सुपारीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने त्यांना मदत जाहीर केली आहे. याच धरतीवर नैसर्गिक आपत्ती म्हणून लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना देखील मदत व्हावी अशी मागणी बागायतदार करीत आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/215721269691267/

 

Protected Content