यावल पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; पो.नि. धनवडे यांचे मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी । बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत यावल पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

२ ऑगस्ट रोजी साजरी होणारी बकरी ईद मुस्लिम बांधवाचा सण तालुक्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेली राष्ट्रीय एकात्मतेची व सर्वधर्म जोपासण्याची परंपरा ही अखंडती राखावी व कोराना विषाणुसंसर्गाच्या पर्श्वभुमीवर महामारीचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन नियमाचे काटेकोर पालन करावे, बकर ईदची नमाज पठण हे सार्वजनिक ठिकाणी किंवा मस्जीदीमध्ये करू नये, गोवंश प्रतिबंधीत हत्या कायद्याचे पालन करावे अशी सुचना व मार्गदर्शन यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठक प्रसंगी केले. या बैठकीस शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, प्रा.मुकेश येवले, माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान, नसीर खान, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, भगतसिंग पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर रवान, पुंडलीक बारी, अनील जंजाळे, हाजी गफ्फार शाह , गुलाम रसुल मेंबर यांच्यासह आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थितीत होते.

Protected Content