महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दोघांनी धुमस्टाईल लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील छत्रपती शिवाजी बगीचा जवळून पायी जात असलेल्या विवाहितेच्या गळ्यातील १६ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र दोन भामट्यांनी दुचाकीवर येऊन जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात सोमवारी ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, हेमलता नामदेव शिंपी  (वय-४५) रा. मुंदडा नगर अमळनेर या महिला पती नामदेव दगडू शिंपी यांच्यासह वास्तव्याला आहे. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हेमलता शिंपी या महिला शहरातील छत्रपती शिवाजी बगीच्या जवळून पायी जात होत्या. त्याचवेळी अज्ञात दोन भामटे दुचाकीने मागून आले. विवाहितेच्या गळ्यातील १६ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र त्यांनी जबरी हिसकावून पसार झाले. या संदर्भात महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवार ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस नाईक कैलास पवार करीत आहे.

Protected Content