कोरोनाच्या काळात साफसफाईच्या निविदा प्रक्रियेसाठी अट्टाहास का ? : नगरसेवक दारकुंडे यांचा प्रश्न

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव महापालिकेने कोरोनाच्या काळात साफसफाई करीत विना निविदा प्रकिया राबवून खासगी ठेकेदाराला काम दिले. तातडीची गरज असतांना आयुक्त निविदा प्रक्रिया राबवतांना बराच कालावधी विनाकारण घालवत असल्याचा आरोप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे, मागिल ६ महिन्या पासुन संपुर्ण जगात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला आहे. जळगावमध्ये देखील या विषाणुचा भरपुर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे असे असतांना जळगांव महानगरपालिकेमध्ये शहराच्या साफसफाईकरीता आपण विना निविदा प्रक्रिया राबवुन खाजगी ठेकेदाराला आपल्या अधिकारात कोरोना संसर्गाचे कारण दाखवुन काम दिले. सद्य परिस्थीतीमध्ये ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण, संशयित रूग्ण, उपचार घेत आहेत त्या ठिकाणी साफसफाई करीता आपण निविदा प्रक्रिया राबविली, २ निविदाधारक आलेले असतांना आपण त्या निविदा न उघडता आजुन ८ दिवसांची मुदत वाढ दिली. ज्या वेळेस निविदा कणयााठी वेक होता आपण विना निविदा काम दिले आणि आता रुग्णाकरीता तातडीची गरज असताना आपण निविदा प्रक्रियेमध्ये वेळ घालवत आहात याच्या मागे कारण काय आहे हे आपण स्पष्ट करायला हवे, आपल्या या धोरणामुळ महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. संपुर्ण प्रक्रिया ही संशयास्पद असून आयुक्तांनी याचा लेखी खुलासा करावा अशी मी मागणी नगरसेवक दारकुंडे यांनी केली आहे.

Protected Content