Home क्राईम शिवाजी नगरातून तरूण बेपत्ता; शहर पोलीसात नोंद

शिवाजी नगरातून तरूण बेपत्ता; शहर पोलीसात नोंद


जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील चिश्तीया पार्क येथील २२ वर्षीय तरूण तरुण 3 डिसेंबरपासून बेपत्ता झाला आहे. याबाबत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील चिश्तीया पार्क येथे संजू किराणासमोर सैय्यद आफ्रिदी सैय्यक कय्युम (वय 22)हा हे पत्नी मुलांसह वास्तव्यास आहेत. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सैय्यद आफ्रिदी हा पथरीचा त्रास होत असून बाहेरुन जावून येतो, असे त्याची आई शिरीन हिला सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर पुन्हा उशीरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबियांनी नातेवाईकांसह शिवाजी नगर परिसरासह सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

सैय्यद आफ्रिदी हा बेपत्ता झाल्याची खात्री झाल्यावर त्याची आई शिरीन यांनी मंगळवार, 8 डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय झाल्टे हे करीत आहेत. उंची 5 फुट, रंगाने सावळा, चेहरा लांब, शरीरयष्टी सडपातळ, अंगात काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व काळे बुट असे त्याचे वर्णन असून या वर्णनाचा तरुण दिसून आल्यास जळगाव शहर पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Protected Content

Play sound