तांबापूरातील चार रिक्षांमधून स्टेपनी व मुळ कागदपत्रांची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा परिसरातील चार रिक्षांची स्टेपनी आणि रिक्षाचे मुळ कागदपत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शरीफ बाबु तडवी (वय-२८) रा. ईच्छादेवी पंचशिल नगर फुकटपूरा जळगाव हे रिक्षा चालक आहेत. २१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अंगणात रिक्षा लावून पार्किंगला लावून रात्री झोपले. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री परिसरातील चार रिक्षांच्या डिक्कीतून मुळ कागदपत्रे आणि स्टेपनी चोरून नेल्याचे सकाळी उघडकीस आले आहे. यात शरीफ तडवी यांची रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू २७९४), वसीम युसूफ पटेल यांची रिक्षा क्रमांक (एमए १९ व्ही ८४०६), शेख कुर्बान शेख लाल यांची रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८६४७) आणि नितीन शुध्दोधन तायडे यांची रिक्षा क्रमांक (एमएच १९ जे ८९०६) यांच्या प्रत्येकाच्या रिक्षातून प्रत्येकी १ हजार रूपये किंमतीची स्टेपनी आणि मुळ कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी शरीफ तडवी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content