महापालिकेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेत रविवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयुक्त सतिष कुळकर्णी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सन २०२२ मध्ये जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत प्रसारीत केलेल्या परिपत्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भात शासनाने नव्याने परिपत्रक काढून रविवारी २० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासकीय पध्दतीने साजरी करण्याच्या सुचना देण्यात आले होते. त्यानुसार जळगाव महापालकिते रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयुक्त सतिश कुळकर्णी यांच्याहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यालय अधिक्षक चंद्रकांत वांद्रे, शहर अभियंता विलास सोनवणे, चंद्रकांत सोनगिरे, संजय पाटील, जितेंद्र रंधे, मनषि अमृतकर, योगेश वाणी, प्रकाश पाटील, मनोज वडनेरे, नरेंद्र जावळे, नितीन पटवे, सुरेश कोल्हे, प्रमोद निकम यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content