प्रतिभाताई शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..!

 

जळगाव, प्रतिनिधी । लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या तसेच बहिणाबाई कोविड केअर सेंटरच्या संचालिका प्रतिभा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दुपारी सेंटरच्या प्रांगणात छोटेखानी वातावरणात व साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

बहिणाबाई कोविड सेंटरचे पदाधिकारी सचिन धांडे ,चंदन कोल्हे ,चंदन अत्तरदे , तुषार वाघुळदे , संदीप पाटील ,पराग महाजन, राजेश पाटील , महेश चौधरी ,भरत कार्डिले , चंद्रकांत नन्नवरे ,प्रमोद पाटील , प्रवीण चौधरी , मिलिंद चौधरी , किरण वाघ , सुमित साळुंखे , कलिंदर तडवी , डॉक्टर्स , सेंटरचे कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिभा शिंदे यांना केक भरविण्यात आला. कोरोना योद्धा व रणरागिणी श्रीमती शिंदे यांच्या कार्याचे , धाडसाचे अनेकांनी कौतुक करून त्यांना सुयश चिंतिले. ” आदिवासी , गोरगरीब , मोलमजुरी करणारे तसेच अन्यायपीडितांना न्याय देण्यासाठी मी अखेरपर्यंत लढेल , यासाठी सर्वांची साथ ही मिळतेच आहे “, असे सांगून समाजाभिमुख कार्य सर्वांनी मिळून करू या , असे त्यांनी सांगितले.

Protected Content