उमाळे जलशुद्धीकरण केंद्राची पाणी पुरवठा सभापतींनी केली पाहणी ! (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरात अनेक ठिकाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार शिवसेनाकडून करण्यात आली होती. गुरुवारी मनपा पाणीपुरवठा सभापती अमित काळे यांनी शहरातील पाण्याच्या टाक्यांची तर शुक्रवारी स्थायी समिती सभापतींसह उमाळे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.

जळगाव शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार शिवसेनेकडून करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत गुरुवारी पाणी पुरवठा सभापती अमित काळे यांनी शहरातील विविध जलकुंभाची पाहणी केली होती. शहरातील जलकुंभ काही दिवसांपूर्वीच स्वच्छ करण्यात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शहराला उमाळे जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होत असल्याने शुक्रवारी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा व पाणीपुरवठा सभापती अमित काळे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेविका दिपमाला काळे, मिनाक्षी पाटील, शहर अभियंता सुनील खडके, शाम भांडारकर आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/281653456263624/

Protected Content