शाहूनगरात तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण; तिघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । पत्नीकडे का बघतो याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना शाहुनगरात घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील शाहूनगर परिसरातील किराणा दुकान जवळ राहणारे नाजिम अब्दुल रशिद हा आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. त्याच भागात सादीक याकुब शेख, कल्लू याकुब शेख, शाहिद याकुब शेख सर्व रा. शाहूनगर यांनी वाईट नजरेने नाजीमच्या पत्नीकडे पाहत होते. पत्नीकडे का बघतो असा जाब नाजिम याने विचारला. या राग आल्याने तिघांनी नाजिम याला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने उजव्या हाताला, कमरेला, पाठीला बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. नाजिम रशीद यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात सादिक शेख, कल्लू शेख, शाहीद शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक भूषण जैतकर करीत आहे.

 

Protected Content