हॉस्पिटलला लिप्ट बसवून देण्याच्या नावाखाली डॉक्टरची आठ लाखात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ॲक्सॉन हॉस्पिटलमध्ये लिप्ट बसवून देतो असे सांगून डॉक्टरची आठ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, राष्ट्रीय महामार्गावर डॉ. निलेश किनगे ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटल आहे. सन २०१७ मध्ये चार मजली हॉस्पिटल नवीन बांधल्याने हॉस्पिटलला लिप्ट बसविण्याचे काम बाकी होते. दरम्यान, शहरातील कायनेटिक लिप्ट इंजिनिअरींग नावाची कंपनीच्या कर्मचारी महेंद्र भदाणे हे डॉ. किनगे यांना भेटून लिप्ट बसविण्याचे कोटेशन दिले. कोटेशन पाहून डॉ. किनगे यांनी हॉस्पिटलला लिप्ट बसविण्यासाठी होकार दिला. त्यानुसार लिप्ट कंपनीच्या नावावर डॉ. किंनगे यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी ४ लाख आणि ३ ऑगस्ट २०१८ रोजी ४ लाख असे एकुण ८ लाख रूपये ऑनलाईन टाकले. मात्र लिप्ट अजूनपर्यंत लावलेली नाही. संशयित आरोपी महेंद्र भदाणे याला वारंवार फोन करून संपर्क केला असता आज करतो उद्या करतो असे सांगितल्यावर डॉ. किनगे यांनी आपली फसवणूक झाल्याचे समजले. गाविंद किनगे यांच्या फिर्यादीवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात महेंद्र भदाणे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.

Protected Content