भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीवर तक्रारदारांचा बहिष्कार

f75a9f46 9b76 4ab0 8b37 cf34dadd7a1b 1

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.२५) सायंकाळी भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र तक्रारदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

 

यासंबंधी समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तक्रारदारांनी म्हटले आहे की, बैठकीची वेळ टळूनही संबंधित जबाबदार आधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित झालेले नाहीत. जिल्हाधिकारी एकेक तक्रारकर्त्यांना आत बोलवत असून तक्रारी ऐकत आहेत, त्यामुळे गळचेपी होत असून बाजू मांडण्यात अडचण येत आहेत.

गेल्या दि.३१ जानेवारीला झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची प्रोसेडींगमध्ये नोंद करण्यात आलेली नाही, त्यावर सचिव म्हणून राहुल मुंडके यांची सही आहे पण ते बैठकीत उपस्थित नव्हते. त्यावेळी कोणकोणते अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते ? ते ही कळलेले नाही, त्यामुळे बैठकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच तक्रारींवर कार्यवाही करण्याची आपली इच्छाशक्ती दिसत नाही, असे आरोप तक्रारदारांनी या निवेदनातून केले आहेत.

Protected Content