एमआयडीसी पोलीसांनी ‘त्या’ चार संशयितांकडून अजून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

जळगाव प्रतिनिधी । चोरीच्या आठ दुचाकींसह चार संशयितांना औरंगाबादेतून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीच्या चौकशीत संशयितांनी अजून तीन दुचाकी काढून दिल्या आहे. चौघे पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेने 5 नोव्हेंबर रोजी ८ दुचाकींसह संशयित आरोपी जमील अय्युब शेख (वय २४, रा. वाळुज एमआयडीसी, औरंगाबाद, मुळ रा. पिंपळगाव हरे, ता. पाचोरा) याला अटक केली होती. त्यानंतर पुढील कारवाईसाठी दुचाकींसह आरोपीला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता जमील शेख याने दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. हा सर्व व्यवहार औरंगाबाद शहरात होणार असल्याने पथक रवाना झाले होते. यात सुनिल बल्लु पवार (वय-३०), समाधान रघुनाथ हुडेकर (वय-२२) आणि शेख शफिक शेख भैय्या (वय-३१) तिघे रा. जरंडी ता. सोयगाव जि. औरंगाबाद या तिघांनी कागदपत्र नसतांना दुचाकी विकत घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना देखील सहआरोपी करण्यात आलेत. चौघांना १० नोव्हेंबर पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता मुख्य आरोपी जमील अय्युब शेख याने पुन्हा तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आता एकुण चोरीच्या दुचाकींची संख्या ११ वर पोहचली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, जितेंद्र राजपूत, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, सचिन पाटील, योगेश बारी यांनी केली आहे.

Protected Content