बायडेन यांना कंगना गजनी म्हणाली

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता जो बायडन यांचा उल्लेख कंगनाने गजनी असा केला आणि गजनी बायडन हे एक वर्षाहून अधिक काळ टीकणार नाहीत असंही कंगनाने म्हटलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या विविध वक्तव्यांमुळे आणि ट्विटमुळे चांगलीच चर्चेत असते. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची कंगनाने स्तुती केली आहे. गजनी बायडन यांचा डेटा दर पाच मिनिटाला क्रॅश होतो. इतकी औषधं आणि इतकी इंजेक्शन त्यांना दिली गेली आहेत त्यामुळे ते फार तर वर्षभर टिकतील या आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे.

कमला हॅरीस यांचं कंगनाने कौतुक केलं आहे. जेव्हा एक स्त्री तिची कारकीर्द स्वतः घडवते तेव्हा ती इतर महिलांसाठी त्या वाटा तयार करत असते असं म्हणत कंगनाने कमला हॅरीस यांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. तर जो बायडन यांच्यावर मात्र टीका केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल काल रात्री लागला. जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हरवत ही निवडणूक जिंकली. आता नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते शपथ घेतील. अशात कंगनाने त्यांचा उल्लेख गजनी बायडन असा केला आहे.

गजनी या हिंदी सिनेमात आमिर खानची स्मृती जाते. त्याच्या डोक्यावर मोठा आघात झालेला असतो. त्याला फक्त गजनी हेच नाव लक्षात असते. तो अनेक गोष्टी विसरत असतो. आमिरने साकारलेल्या याच पात्राची तुलना कंगनाने जो बायडन यांच्यासोबत केली आहे. त्यामुळेच तिने जो बायडन यांचा उल्लेख गजनी बायडन असा केला आहे. कंगना तिच्या अशा वक्तव्यांमुळे आणि ट्विट्स मुळे चर्चेत असते. साधारण दोन महिन्यांपूर्वी तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. ज्यावरुन तिच्यावर चांगलीच टीकाही झाली. अशात आता तिचं हे नवं ट्विट समोर आलं आहे.

Protected Content