आव्हाणे शिवारातील शेतातून २७ हजार रूपये किंमतीचे शेतीच्या सामानांची चोरी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील विद्यूत पंप, तार आणि शेतीचे अवजारे असा एकुण २७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याचे आज सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रविंद्र ओंकार पाटील (वय-५२) रा. आव्हाणे ता. जि.जळगाव यांचे आव्हाणे शिवारात गट नं. ७२९ शेती आहे. शेतात त्यांचे घर देखील आहे. सध्या शेतीचे कामे नसल्यामुळे त्यांनी सबमर्सिबल पंप, तारा व शेतीचे अवजारे शेताच्या खोलीत कुलूप लावून ठेवले होते. ४ जानेवारी रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीचा सबमर्सिबल पंप, ५ हजार रूपये किंमतीचा तांब्याची तार आणि दोन हजार रूपये किंमतीचा वखराचे लोखंडी पास असा एकुण २७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे उघकीला आले. याप्रकरणी रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील हे करीत आहे.

Protected Content