जळगाव संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात संचारबंदी लागू असतांना अनावश्यकरित्या फिरणाऱ्या सात जणांवर आज कारवाई केली असून त्यांच्या विरोधात कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अहे.

याबाबत माहिती अशी की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यातील ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आज एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत शहरात विनाकारण दुचाकीवर फिरत असलेल्या नागरीकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली. पोलीसांनी एकुण सात जणांवर कारवाई केली.

यात साबीर खान अफसर खान (वय-२३) रा. शेरा चौक, शेख मुक्तार शेख मुनाफ (वय-५०) रा. मास्टरकॉलनी. शेख मुक्तार शेख मुनाफ (वय-५०) रा. मास्टरकॉलनी, संदीप हीरामन कोळीवय (वय-३३) रा.व्यायामशाळेजवळ, कुसुंबा ता जि जळगाव, सुनिल नारायण हीरे (वय-४८) रा. तुकारामवाडी अमोल पेट्रोलपंप ता.जि. जळगाव, शादाब खान अब्दुल कलाम खान (वय-४६) रा. सालारनगर, ता.जि. जळगाव, स्वप्नील रामचंद्र खंबायत (वय-३०) रा. सिध्दीविनायक शाळेजवळ सबगुरु नगर जळगाव

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हजारे, पोउनि सोनवणे, सफौ अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील आबा महाजन, राजेंद्र ठाकुर, कृष्णा पाटील, योगेश बारी सचिन पाटील, इम्रान सय्यद, इम्रान बेग, संजय धनगर, चेतन सोनवणे, श्रीकांत बदर अशांनी कारवाई केली.

Protected Content